Sunday, August 31, 2025 11:10:02 AM
हगवणे कुटुंबीयांवर वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर आता JCB फसवणुकीचा आरोप; इंडसइंड बँकेची चौकशी सुरू, शशांक व लता हगवणे पोलीस कोठडीत; बनावट कागदपत्रांची शक्यता.
Avantika Parab
2025-06-04 16:23:07
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी, 'हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीचं बाहेर अफेअर आहे, असं सांगणं चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Ishwari Kuge
2025-05-31 14:50:48
वैष्णवी हगवणे प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे पुणे पोलिसांनी हगवणे बंधूंना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याची चर्चा होत आहे.
2025-05-31 13:36:55
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे रोजी संपणार आहे. शनिवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
2025-05-31 10:54:00
आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर निलेशला नेपाळहून विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे.
2025-05-31 07:01:42
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 9 महिन्यांच्या बाळाचे संगोपन कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या, वैष्णवीचे बाळ त्याच्या आजी-आजोबांकडे म्हणजेच वैष्णवीच्या माहेरी आहे.
2025-05-31 06:44:47
राज्यात सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु आहे आणि आता हगवणेंचा हावरटपणा समोर आला आहे. चांदीच्या भेट वस्तूंचा हा व्हिडीओ आहे.
Apeksha Bhandare
2025-05-29 15:59:57
पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलिसांचे तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. निलेश चव्हाणला पकडून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.
2025-05-29 12:52:16
बुधवारी हगवणे कुटुंबीयांना कोर्टात हजर केले होते. तेव्हा आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टासमोर करण्यात आली होती.
2025-05-29 11:48:46
गुरुवारी, मृत वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपत आहे. दुपारी 3 वाजता या तिघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
2025-05-29 10:50:02
हुंड्यासाठी झालेल्या छळाची पत्नी किंवा तिच्या नातेवाईकांनी औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही, याचा अर्थ हे आरोप खोटे ठरतात, असे होत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली.
Amrita Joshi
2025-05-28 19:42:53
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना मंगळवारी बावधन पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याच पाच जणांना आज पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
2025-05-28 12:43:02
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवालातून 29 मारहाणीच्या खुणा समोर; मृत्यूपूर्वीही ती छळाला सामोरी गेल्याचं धक्कादायक वास्तव उघड.
Avantika parab
2025-05-27 19:00:12
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने बडेजावी लग्नसंस्कृती, हुंडा पद्धत व मानसिक छळाचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली होणाऱ्या अशा लग्नाचा काय उपयोग?
2025-05-27 17:20:25
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता- पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांकडून त्यांना अटक केली.
2025-05-27 12:56:26
चौकशीच्या केंद्रस्थानी असलेली करिष्मा हगवणे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे राजेंद्र आणि लता हगवणे यांची कन्या करिष्मा हगवणे उर्फ पिंकी ताई आहे तरी कोण?
2025-05-25 10:35:23
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत हगवणे कुटुंबीयांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कस्पटे कुटुंबाच्या महिलांनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर केली.
2025-05-25 09:30:29
पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली तसेच त्यांना धीर दिला आहे. ज्यांनी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला, त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल, पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबियांना आश्वस्त केले.
2025-05-25 08:46:32
रविवारी, गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 206/25 च्या तपासात मृत वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
2025-05-25 08:36:14
2025-05-24 07:45:53
दिन
घन्टा
मिनेट